Wednesday, November 7, 2012

पोस्टाचे सोने 'लुटले'! Indian Post selling Gold Coins

* प्रचंड प्रतिसादामुळे योजना डिसेंबरपर्यंत



गुरूपुष्याच्या मुहुर्तावर मंगळवारी अनेक जण सोनेखरेदीसाठी ज्वेलरऐवजी चक्क ' जीपीओ ' कडे वळले होते. सकाळी तर ' जीपीओ ' मध्ये रांगा लागल्या. पोस्ट खात्याने ७ टक्के सवलतीत देऊ केलेले हे सोने लुटण्यासाठी ही गर्दी होती. संध्याकाळपर्यंत जवळजवळ चार किलो सोन्याच्या नाण्यांची विक्री झाली. ही योजना ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी पोस्ट विभागाने मंगळवारी सोन्याच्या नाण्यांवर सात टक्क्यांपर्यंत सवलत दिली. मुंबई , पुणे , गोवा , औरंगाबाद आणि नागपूर येथील निवडक पोस्ट कार्यालयांमध्ये सोनेखरेदीची सोय होती. अर्धा , एक , पाच , आठ , दहा , २० आणि ५० ग्रॅमच्या वजनातील २४ कॅरेटची ही नाणी स्वित्झर्लंडच्या वेलकेम्बी कंपनीने प्रमाणित केली असून ती ९९.९९ टक्के शुद्धतेची आहेत. ही नाणी टेम्परप्रूफ पॅकिंगमध्ये रिलायन्सने टपाल खात्यामार्फत उपलब्ध केली होती.

सकाळीच मुंबईतील जीपीओमध्ये ग्राहकांनी रांगा लावल्या होत्या. दिवाळीच्या तोंडावरच हे सोने सवलतीत मिळत असल्याने खरेदीसाठी गर्दी झाली होती. मंगळवारी संध्याकाळपर्यंत चार किलो पर्यंत सोन्याची विक्री झाली. मागील वर्षी गुरूपुष्य नक्षत्राच्या मुहुर्तावर पोस्टाने महाराष्ट्र सर्कलमध्ये २० किलो सोन्याची विक्री केली होती. त्यावेळी एका दिवसात साडेसहा किलो सोने विकण्याचा विक्रम नोंदवण्यात आला होता.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive