Monday, November 5, 2012

अंड्याची टरफलं कॅन्सरवर गुणकारी - Egg cover useful on cancer


अंड्याची टरफलं कॅन्सरवर गुणकारी


' संडे हो या मंडे , रोज खाओ अंडे ' हे स्लोगन गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला परिचित आहे . अंड्याचे फायदेही आपल्याला ठावूक आहेत . त्यांची टरफलं मात्र आपण फेकून देतो . त्याच टरफलांचा उपयोग कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराच्या उपचारासाठी होणे शक्य असल्याचे नुकत्याच झालेल्या संशोधनात निदर्शनास आले आहे . अमेरिकेतील टस्किगी विद्यापीठात झालेल्या या संशोधनाचे नेतृत्त्व मूळ भारतीय असलेल्या प्रा . विजयकुमार रंगारी यांनी केले आहे .

काही का ळापूर्वी पुण्यात झालेल्या ' नॅनोकॉन ०१२ ' च्या निमित्ताने मटाने प्रा . रंगारी यांच्याशी संवाद साधला . '' अंड्यांच्या टरफलांचा वापर करून नॅनो आकारातील बहुपयोगी कॅल्शिअम कार्बोनेट (CaCO3) मिळविण्यामध्ये आम्हाला यश आले आहे . अंड्यांच्या वापर करून अत्यंत सूक्ष्म आकारातील सच्छिद्र कॅल्शिअम कार्बोनेट मिळविण्याची पद्धतही या संशोधना दरम्यान पहिल्यांदाच शोधून काढण्यात आली आहे . कॅल्शिअम कार्बोनेटचा वापर सर्वच प्रकारच्या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो . त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे वैद्यकशास्त्रातही त्याला महत्त्व आहे . मात्र , आपल्याकडे अद्यापही खडकांमधून मिळणाऱ्या कॅल्शिअम कार्बोनेटवर हे सर्व अवलंबून आहे . परंतु त्याची निर्मिती प्रक्रिया जैवसुसंगत ( बायोकाँपेटिबल ) नसल्याने त्याच्या वापरांवर मर्यादा येतात . मात्र , अंड्यांच्या कवचामध्ये ९५ टक्के कॅल्शिअम कार्बोनेट असते . या प्रक्रियेतून मिळालेल्या कॅल्शिअम कार्बोनेटच्या अगदी सूक्ष्म ' प्लेटलेट स्ट्रक्चर ' चा आकार अंदाजे १० ते १५ नॅनोमीटरच्या घरात आहे . ते मुळातच सच्छिद्र स्वरूपात असते . त्यामुळे ते अत्यंत क्रियाशील आणि जैवसुसंगत आहे .'' असे प्रा . रंगारी यांनी ' मटा ' ला सांगितले .

नॅनो कॅल्शिअम कार्बोनेटचे उपयोग

- कॅन्सरच्या प्रभावी उपाचारासाठी उपयोगी .

- नॅनो स्वरूपात असल्याने उपचारा दरम्यान मुतखड्याचा त्रास होण्याची शक्यता नाही .

- कॅल्शिअम पुरविणाऱ्या गोळ्यांमध्ये उपयोगी .

- कॅल्शिअम कार्बोनेट आणि चांदीच्या नॅनोकणांच्या साहाय्याने पाणी गाळण्यासाठी चांगल्या दर्जाचा फिल्टर बनविण्यासाठी उपयोगी .

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive