Monday, November 5, 2012

India Pakistan Cricket Matches banned in India - Thakare


भारत-पाक सामने उधळून लावा:ठाकरे


Balasaheb.jpg

जिथे जिथे पाकड्यांचे सामने असतील तिथे तिथे हे सामने होऊ देऊ नका . उधळून लावा . पाहूया काय होते ते !, अशा कडक शब्दात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तमाम देशप्रेमींना कळकळीचे आवाहन केले आहे . गृहमंत्री शिंदेच्या विरोधात बाळासाहेबांनी चांगलीच बॅटिंग केल्याने भारत - पाक सामने ' सीमापार ' होणार का ?, असा प्रश्न जनतेला पडलेला आहे .

झाले गेले विसरून जाऊया पाकिस्तानशी क्रिकेट खेळूया या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कडक शब्दांत समाचार घेतला आहे . शिंदेसाहेब , थोडी जरी तुमच्यात लाजलज्जा शिल्लक असेल तर हे निर्लज्ज वक्तव्य मागे घ्या . नाही तर जेथे जेथे हे पाकिस्तानचे क्रिकेट सामने होणार आहेत तेथील कडवट हिंदू , स्वाभिमानी , देशाभिमानी जनता हे सामने होऊ देणार नाही !, अशा स्पष्ट शब्दात बाळासाहेब ठाकरे यांनी शिंदेंना इशारा दिला आहे .

शिवसेनाप्रमुख बाळासाबहे ठाकरे यांनी ' सामना ' तून शिंदे यांना केलेले कडक सवाल :

> अहो शिंदेसाहेब , कशाला हिंदुस्थान - पाकिस्तान क्रिकेट सामने खेळवण्याचा नादानपणा आपण करीत आहात ? आणि किती निर्लज्जपणाने आपण बोलता की , झाले गेले विसरून जाऊया , पण काय विसरायचे आणि कसे विसरायचे ?

> छत्रपती शिवाजी टर्मिनसवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेला रक्तपात आपण इतक्या सहजपणे विसरू शकतो ? हिंदुस्थान - पाकिस्तानचे हिंसक संबंध फाळणीपासून सर्वश्रुत आहेत . त्यांनी हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वावर घातलेला प्रत्येक घाव कसा विसरायचा ?

> अफझल गुरूलाही फाशी ठोठावून ११ वर्षे झाली . आपल्या सार्वभौम संसदेवर त्याने हल्ला केला . त्या हल्ल्यात जवान शहीद झाले . ते अतिरेकी त्यावेळी आत घुसले असते तर आपल्या तिरंग्याचा रंग हिरवा झाला असता , याचे तुम्हाला काहीच वाटत नाही ?

> आता तो अबू जिंदाल पकडला आहे . त्याच्यावरही खटला चालेल फाशी ठोठावली जाईल . नंतर हा जिंदालही फाशीची सजा रद्द करा म्हणून दयेचा अर्ज करणारच आहे . तोही दयेचा अर्ज आपण फेटाळून लावणार की हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाऊन बसणार ?

इतकेच नाही तर पाकिस्तानच्या अतिरेकी कारवाया हिंदुस्थानच्या भूमीवर चालूच आहेत , नव्हे दिवसेंदिवस त्यांचा उच्छाद वाढतोच आहे . त्यांना चिरडण्याचे राहिले बाजूला , उलट त्यांच्याबरोबर क्रिकेटचे सामने खेळवले जात आहेत . खरोखरच असे नादान नेते या देशाला मिळाले हे या देशाचे दुर्दैवच म्हणायला हवे , असे म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे .

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive