अख्खं वर्ष राब राब राबून
जमा केलेल्या लक्ष्मीचं पूजन मोठय़ा मनोभावानं आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी
करतो. घरातली सर्व संपत्ती पाटा-चौरंगावर मांडलेली पाहून मोठय़ांना आपण
केलेल्या कष्टाचं कौतुक वाटतं, तर लहानांना ‘अरे, आपल्याकडे एवढे पैसे,
म्हणून आश्चर्य वाटतं. पण घरात येणारी लक्ष्मी कष्टाशिवाय येत नाही आणि ती
जपून वापरल्याशिवाय घरात थांबत नाही, हे मुलांना सांगितल्याशिवाय कसं
समजेल? मुलांच्या मनात उगवलेल्या पैशाच्या झाडाला पैसे कसे लागतात, हे
मुलांना लहान वयातच समजून देण्याची जबाबदारी आई-बाबांची आहे, नाही का..?
पाच वर्षांच्या मुलीला दुचाकीवर बसवून मी बाजारात गेले होते. महिन्याचा किराणा आणण्याचं काम कधीच उरकलं होतं; पण काही बारीकसारीक वस्तूंची खरेदी शिल्लक होती. पर्समध्ये मोजकेच पैसे आहेत हे गाडीला किक मारून घरापासून बरंच लांब गेल्यावर माझ्या लक्षात आलं. अर्थात, पर्समध्ये असणारे पैसे माझ्या खरेदीसाठी पुरेसे होतील ही मला खात्री होती. म्हणून मग पुन्हा घराकडे न वळता तशीच बाजारात जाऊन पोहोचले. हव्या त्या वस्तूंची खरेदी झाली. मुलगीही बरोबर होतीच. तेवढय़ात बाईसाहेबांना खेळण्याचं दुकान दिसलं आणि तिचा हट्ट सुरू झाला. मग आमचा मोर्चा त्या खेळण्याच्या दुकानाकडे वळला. हे द्या ते द्या झाल्यानंतर तिनं तिच्या आवडीच्या दोन खेळण्या काढल्या. किंमत माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त होती. खेळणीवाला ओळखीचा असल्यानं नंतर द्या पैसे, असं मुलीसमोरच म्हणाला त्यामुळे बाईसाहेबांचं काय फावलंच..
तरीही मी तिला जरा बाजूला घेऊन म्हणाले, ‘माऊ, आईच्या पर्समध्ये थोडेच पैसे आहेत, या पैशात जे खेळणं येईल ते घेऊया. उगीच आपल्याजवळ पैसे नसताना काकांकडून महागातलं खेळणं घेणं बरोबर नाही.’ तर माझी चिमुकली, मोठा गंभीर चेहरा करत म्हणाली, ’आई आपण त्या पैसे मिळणार्या दुकानात जाऊ ना. तिथून तू पैसे घे आणि मग येऊया इथे पुन्हा. म्हणजे सगळे पैसे देऊन खेळणं घेता येईल.’
मी जरा गोंधळात पडले होते. कसल्या पैसे मिळणार्या दुकानाबद्दल माऊ बोलतेय मला काही समजेना. मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला तरी तिचं आपलं पैसे मिळणार्या दुकानाचंच पालूपद चालू होतं. तेवढय़ात मला मध्येच अडवत खेळण्याच्या दुकानातले काका म्हणाले, ‘अगं ती एटीएमबद्दल बोलतेय.’
जे मला कळलं नाही ते त्यांना बरोब्बर समजलं. कदाचित त्यांच्या दुकानात येणारी माऊसारखी अगणित मुलं एटीएमचा उल्लेख अशाच अजबगजब शब्दांनी करत असावीत.
माझी एकदम ट्यूब पेटली.
एटीएम हे एक दुकान असतं आणि त्या दुकानात गेलं की आपल्याला आपोआप पैसे मिळतात, असा माऊचा समज झाला होता. त्यामुळे आपल्याकडे पैसे नाहीत किंवा ते कमी आहेत, ही भावनाच तिच्यापाशी नव्हती. त्या दुकानात गेलं की लगेच पैसे मिळतात. त्यामुळे ते पर्समध्ये नसले तरी पैसे मिळण्याच्या दुकानात जाऊन आणता येतात, असा तिचा पक्का समज झाला होता. जो दूर करणं मला प्रचंड कठीण गेलं. त्यादिवशी तिचं मन मोडून पर्समध्ये होते त्याच पैशात बसेल असं खेळणं घेऊन घरी आले आणि मनाशी पं केलं की माऊला आतापासूनच पैशांची किंमत आणि तिच्या आईबाबांना किती पैसे मिळतात याची कल्पना द्यायची.
ही घटना मी माझ्या एका मैत्रिणीला सांगितली तर ती म्हणाली, ‘हो गं सांगितलंच पाहिजे मुलांना. काय अवाच्यासवा मागण्या असतात गं त्यांच्या आणि तुला माझ्यावरून सांगते. मी कॉलेजला जाईस्तोवर मला कल्पनाच नव्हती माझ्या बाबांना किती पैसे मिळतात याची. त्यांनी ते आयुष्यभर आमच्यापासून लपवून ठेवलं. आम्ही मागू ती गोष्ट आम्हाला ते देत गेले. परिणाम, एखादी गोष्ट मिळणार नाही हा विचारच मला पचवणं आजही जड जातं. आम्ही मध्यमवर्गीय होतो; पण बाबांना आम्हाला उच्चमध्यमवर्गीयांसारखं वाढवलं. त्यासाठी स्वत:च्या पोटाला चिमटे घेतले, कर्ज काढली. त्यामागे त्यांचा हेतू चांगलाच होता गं, पण आमचं काहीसं नुकसान झालं असं आज नक्कीच वाटतंय.’
आपण आपल्या मुलांशी अगणित गोष्टींबद्दल बोलत नाही. त्यातलीच एक म्हणजे घरात येणारा पैसा.
कुटुंबाची आर्थिक स्थिती मुलांना अनेकदा माहीत नसते. माझ्या ओळखीतल्या एका मुलीनं साखरपुडा थाटामाटात, फाइव्ह स्टारमध्ये झालाच पाहिजे या हट्टापायी साखरपुड्यासाठी वडिलांना कर्ज काढायला भाग पाडलं. कारण त्याखाली साखरपुडा करणं तिच्या मते तिला शोभत नाही. लहानपणापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढविलेल्या या मुलीला तिच्या वडिलांच्या आर्थिक स्थितीची उशिरा का होईना जाणीव झालेली होती; पण तोवर एक विशिष्ट पद्धतीनं जगण्याची सवयही झालेली होती त्यामुळे त्यात बदल करण्याच्या मानसिकतेत ती मुळीच नव्हती. ज्याचा परिणाम म्हणजे लग्नाच्या आधीच वडिलांच्या डोक्यावर कर्जाचं झाड उगवलं.
पैसा हाही एक संस्कार आहे. ज्याप्रमाणे आईवडील वाचणारे असतील तर घरातली मुलांनाही वाचनाची आवड निर्माण होते. पैशांचंही तसंच आहे. मोठे सजगपणे आणि समजुतीने पैशांकडे बघत असतील तर मुलांनाही पैशांचं महत्त्व कळतं. तो कसा हाताळला पाहिजे हे निराळं सांगण्याची त्यांना गरज उरत नाही.
आजच्या शहरीकरणाच्या काळात, जिथे महानगरात जन्माला येणारी मुलं शहरीकरणाचे संस्कार घेऊनच जन्माला येतात, तिथे पैशांचा संस्कार मुलांमध्ये रुजवण्यासाठी पालकांना विशेष मेहनत घ्यावीच लागते. निदान माझा तरी तसा अनुभव आहे. मुलांना पैशाचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी मी काही युक्त्या वापरल्या होत्या. खरंतर प्रत्येक जण याबाबत निरनिराळे प्रयोग करू शकतात. मी काय केलं ते आज मी शेअर करते. माझ्या मुलांना खरंच त्यातून काही मिळालं की नाही हे काळच ठरवेल. पण आई म्हणून जे प्रयत्न करणं अवश्यक होतं ते करण्याचा प्रयत्न मात्र मी केला आहे आणि करते आहे.
मी लढवलेल्या छोट्याशा युक्त्या-
जे आपल्याला मिळालं नाही ते मुलांना मिळालं पाहिजे, असं सगळ्याच पालकांना वाटतं. पण मुलं साधारण कळत्या वयाची झाल्यानंतर प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतात, याचीही जाणीव त्यांना करून देणं गरजेचं वाटतं. मागच्या वर्षी माझ्या दहा वर्षाच्या मुलाला भाऊबिजेसाठी माऊला भेटवस्तू आणण्यासाठी स्वत: पैसे कमव, असं मी सुचवून बघितलं. त्यालाही ही कल्पना खूप आवडली. त्याला भांडवल म्हणून मी २00 रुपये दिले होते. त्यातून त्यानं ग्रिटिंग्ज्, पणत्या, उदबत्त्या असं काही सामान विकत आणलं, त्याचे विक्रीचे दर ठरवले आणि कॉलनीतल्या घराघरात जाऊन, मित्रांच्या आयांना भेटून त्यानं तो माल खपवला. वरून नफा कमवत माऊला ओवाळणी म्हणून स्वकष्टातून आणलेलं मस्त गिफ्टही दिलं. हे सगळं करत असताना अर्थातच त्याला मी आणि त्याच्या बाबांनी मदत केली. पण आपण आपल्या बहिणीसाठी स्वकष्टातून काहीतरी आणलंय याचा त्याला आणि माऊला कोण आनंद झाला होतो की, तो शब्दात मांडताच येऊ शकत नाही. त्या दोघांच नातं घट्ट झालंच पण त्याचबरोबर त्याला कष्टाची किंमतही कळाली, व्यवहारज्ञान मिळायला सुरुवात झाली आणि पैसा मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतात हे कुठेतरी नकळत मनात रुजलं गेलं असेल असं वाटतं.
मुलांनी मागितली की ती गोष्ट त्यांना जरूर द्यावी; पण त्याची फ्रिक्वेन्सी ठरवता आली पाहिजे. म्हणजे अशी मागितलेली वस्तू किती वेळा आणून द्यायची. कारण मुलं रोजच काही ना काहीतरी मागतात. आमच्याकडे अशी मागेल ती वस्तू देण्याची फ्रिक्वेन्सी महिन्या-दोन महिन्यातून एखाददा इतकीच आम्ही जाणीवपूर्वक ठेवलेली आहे.
पालक म्हणून आम्ही दोघंही आमच्या मुलांशी आमच्या कामाबद्दल, त्यातल्या कष्टांबद्दल सातत्यानं बोलतो. त्यांना त्यातलं फारसं काही समजत नसेलही कदाचित; पण कळतनकळत घरातली आर्थिक सुबत्ता कष्टातून येते हा संस्कार त्यातून होत असेल असं नक्की वाटतं.
आम्ही आमच्या मुलाला पॉकेटमनी देतो. त्याचा हिशेब ठेवायला आम्ही त्याला शिकवलं आहे. त्याला मिळणारे पैसे त्यानं कसे आणि कुठे वापरायचे हा निर्णय आम्ही पूर्णपणे त्याच्यावर सोपवलेला आहे. अर्थात, ते पैसे नेमका कुठा आणि कसे वापरतोय याकडेही आमचं बारीक लक्ष असतं. त्याच्या हिशेबाची वहीदेखील आम्ही अधूनमधून बघत असतो.
दादाला पॉकेटमनी मिळते तेव्हा चिमुकलीच्या पिगीबँकमध्ये टाकायलाही सुटी नाणी देतो. तिनं ती जपून स्वत:च्या हातानं पिगीबँकेत टाकली पाहिजेत यासाठी आग्रही असतो. तिला नोटांची, नाण्यांची ओळख करून दिली आहे. त्यामुळे कुणा पाहुण्यारावळ्यांनी तिच्या हातावर पैसे ठेवले की बाईसाहेब लगेच तुरुतुरु आपल्या पिगीबँकमध्ये ते पैसे टाकून देतात. पैसे नीट जपून ठेव हं, असं तिला सांगावंही लागत नाही.
तुम्हीही अशा काही युक्त्या करू शकता. सरस्वतीबरोबर लक्ष्मीचाही सन्मान करायला आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. कदाचित त्यांच्या आयुष्यातले कितीतरी प्रश्न आपण त्यामुळे सोपे करू शकतो आणि तेही त्यांच्या या वयातच..!

No comments:
Post a Comment