Friday, March 16, 2012

How to tackle problems in air travelling?

 How to tackle problems in air travelling?

टेक ऑफ
परीक्षा संपली की बाहेरगावी जाण्याचे वेध लागतात. अनेकांनी विमानप्रवासाचेही बेत आखले असतील. प्रथमच विमानप्रवास करणार्‍या नवख्यांना विमानातल्या अनेक गोष्टींची माहिती नसते व अशावेळी त्यांना बर्‍याच समस्यांना सामोरे जावे लागते. विमानात जाण्याआधी व बसल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे याविषयी...


मोशन सिकनेस
जसं बस, कार, ट्रेनचा प्रवास करताना काही जणांना त्रास होतो तसाच विमानाच्या प्रवासाच्या वेळीही बर्‍याच जणांना उलटी होणे, नौशिया येणे, चक्कर येणे असे त्रास होतात. असा त्रास होऊ नये यासाठी काही टिप्स :
* विमानाचा प्रवास कधीही रिकाम्या पोटी करू नये. प्रवासाच्या एक तास आधी सॅण्डविज खावे. सॅण्डविजसोबत लिंबूपाणी प्यायल्यास अधिक उत्तम.
* विमानप्रवासात उंचावर रक्तदाब व ऑक्सिजन लेव्हल कमी होत जाते. उड्डाणाच्या आधी जर आपण काही खाल्लेलं असेल तर आपल्याला रक्तदाबाचा त्रास होणार नाही आणि आपली ऑक्सिजन लेव्हलही वाढेल.
* विमानप्रवासाच्या सहा ते आठ तास आधी मद्यपान, अतिजेवण, जास्त स्निग्ध पदार्थ, जास्त ऍसिड असलेले पदार्थ, दुधाचे पदार्थ खाणे टाळा.
* विमान प्रवासात प्रत्येक दोन तासांनी काही खारट पदार्थ खा. प्रवासात जास्त तेलकट, तिखट पदार्थ खाणं टाळा.
* जर तुम्हाला विमानप्रवासात त्रास होत असेल तर सीट मागे करून डोळे बंद करून रिलॅक्स बसा.
* जर तुम्हाला विमानप्रवासाचा जास्त त्रास होतो तर प्रवास सुरू होण्याच्या ४५ मिनिटे अगोदर डॉक्टरांना विचारून प्रवासी गोळी घ्या.

पूर्वतयारी :
१) तिकीट बूक करताना आपली सीट टॉयलेट व इंजिनपासून लांब असेल याची खात्री करून घ्या. तसंच प्रवासात जर तुम्हाला काही खायचे असेल तर तिकीट बूक करतानाच आपल्या जेवणाचंही बूकिंग करून घ्या.
२) विमानतळावर तसेच विमानात आपल्याला कोणकोणत्या चेकिंगला सामोरे जावे लागणार आहे याची इंटरनेटवरून, एअरलाइन रूल गाईडलाइनवरून किंवा आपल्या ट्रॅव्हल एजंटकडून माहिती करून घ्या.
३) आपल्या विमानाच्या उड्डाणाच्या वेळेच्या किमान अर्धा तास आधी विमानात बसून घ्या. याने आपली धावपळ होणार नाही.
४) जर तुमच्या सोबत लहान मुलं प्रवास करत असतील तर त्यांच्या बॅगा व्यवस्थित तपासून घ्या. बर्‍याचदा मुलं नकळतपणे काही विमानात न चालणार्‍या वस्तू बॅगेत भरू शकतात. या वस्तू तपासनीच्यावेळी सापडल्या तर तुम्हाला विनाकारण चौकशीला सामोरे जावे लागेल.


विमान लेट झाल्यावर
* विमानप्रवास करताना एक गोष्ट लक्षात घ्या की विमान आपल्या उड्डाणाच्या वेळेपेक्षा बर्‍याचदा उशिरा उडते. अशावेळी आपलं मन रमू शकेल अशा काही गोष्टी नेहमी स्वत:सोबत ठेवा. पुस्तकं, आयपॉड, लॅपटॉप, वर्तमानपत्र, खाण्याचे काही झटपट पदार्थ सोबत असले की आपला वेळ सहज निघून जातो. तसंच प्रवासात ही या वस्तूंचा फायदा होतो. विमान लेट झाल्यावर वैतागत बसण्यापेक्षा थोडं इथे तिथे फिरा. याने तुम्ही रिलॅक्स व्हाल.

उड्डाणाच्या व उतरण्याच्या वेळी
बर्‍याचजणांना विमान उड्डाणाच्या व उतरण्याच्या वेळी पोटात गोळा येणे, कान बंद होने असे त्रास होतात. अशा वेळी हे जरूर करा...
* कान बंद झाल्यावर प्रथम नाकपुड्या बंद करा व गाल फुगवा याने ब्लॉक झालेले तुमचे कानाचे पडदे खुलण्यास मदत होईल.
* सरळ बसा. मोठा श्‍वास घ्या. ओठ घट्ट बंद करा. नाक बंद करून गाल फुगवून घ्या. मान हळू हळू खाली छातीजवळ आणा याने तुमचे बंद झालेले कान लगेच उघडतील.
* जर तुमचं मन आणि डोकं तुम्ही कामात व्यस्त ठेवलात तर तुम्हाला या गोष्टींचा त्रास होणार नाही.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive