Friday, March 23, 2012

देवपूजेमागचं शास्त्र - Science behind pooja

देवपूजेमागचं शास्त्र - Science behind pooja



हिंदू धर्मामध्ये देवपूजेला अनन्यसाधारण महत्त्व असून देवपूजेचे वैयक्तिक अनेक फायदे आहेत. देवपूजेदरम्यान करण्यात येणाऱ्या प्रत्येक क्रियेमागे एक शास्त्र असून त्यामुळे आपलं शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य चांगलं राहतं.

..........

आपल्या हिंदू धर्मामध्ये अऱ्हिकाचं महत्त्व आहे. त्यात स्नान, संध्या, पूजा हे सर्व कार्यक्रम जर रोज नेहमीच्या वेळेत ठेवलं तर अनेक चमत्कार घडून येतात आणि त्याचा आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी लाभ होत असल्याचं अनेक प्रयोगांमधून सिद्ध झालेलं आहे. देह हे ईश्वराचं मंदिर मानलेलं आहे. स्नान केल्यावर कपाळावर तिलक धारण करणं म्हणजे एक छोटी देवपूजा होय. तिलक धारण करण्यामागे आणखी एक कारण म्हणजे तो धारण करताना मध्यमेचा उपयोग करावा, असं शास्त्र सांगतं. मध्यमेचा संबंध हृदयाशी असल्यामुळे अंगुलीतून प्रवाहित होणारी स्पंदनं प्रत्यक्ष हृदयाला जाऊन भिडतात. यामुळे दिवसभर मनात भक्तिभाव आणि शांती नांदते. तिलक धारण करण्यापूवीर् काही वेळेला सर्वांगास भस्म लावण्याची पद्धत आहे. भस्मामध्ये दुर्गंधनाशक आणि मनाला उत्तेजक अशी संप्रेरक दव्य असतात. नियमित भस्म लेपण केल्यामुळे संधिवातासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. त्याचबरोबर अंगातील तेज आणि ओज यांचं जतन होतं. देवपूजा करताना पितांबरसारखं वस्त्र नेसण्याचा प्रघात आहे. यामध्ये रेशीम किंवा लोकरीचं वस्त्र अधिक लाभदायी ठरतं. कारण धामिर्क कार्याच्या वेळी मंत्रोच्चारातून निघणारी स्पंदनं आणि विद्युत लहरी त्वरीत अंगभर फिरवण्यासाठी अंगास घर्षण होणारी रेशमी किंवा लोकरी वस्त्रं अधिक उपयोगी पडतात. याशिवाय अशी वस्त्रं स्वच्छ करण्यासाठी सोपी असतात.

आसनाबद्दल धर्मग्रंथात विस्तृत चर्चा केलेली आहे. ज्या आसनावर बसून माणूस बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक विकास करून घेतो त्याची वैज्ञानिकता पूर्णपणे सिद्ध झालेली आहे. विद्युतप्रवाहाच्या असंक्रामक आणि संक्रामक वस्तंुच्या तत्वावर प्राचीन ऋषीमुनींनी आसनासाठी विविध वस्तंुची योजना करण्यास सांगितलेलं आहे. गायीच्या शेणाने सारवलेली जमीन, कुशासन, मृगाजिन, व्याघ्रजिन, लोकरीचं कापड इत्यादी वस्तू असंक्रामक आहेत. अशा आसनावर बसून देवपूजा अथवा साधना केल्यास पृथ्वीतील विद्युतप्रवाह शरीरावर कोणताही अनिष्ट परिणाम करू शकत नाही. तसंच पाथिर्व विद्युतप्रवाहापासून आपलं संरक्षण होतं. त्याचबरोबर या आसनांच्या विशिष्ट प्रवाहामुळे सत्वगुणाचा विकास होतो. अंगातील तमोगुण वृत्ती आपोआप नष्ट होते. तसंच या आसनांवर दीर्घकाळ साधना करणाऱ्या व्यक्तीला मूळव्याध, भगेन्द इत्यादी प्रकारचे रोग होत नाही. साधना करत असताना अंगात निर्माण होणारी अतिरिक्त उर्जा आणि उष्णता यांचं निचरा होणं आवश्यक आहे. आवश्यक नसलेली पृथ्वीमधली उष्णता आणि उर्जा आपल्या अंगात संक्रमित होऊ न देणं महत्त्वाचं आहे. यासाठी लाकडी पाट वापरणं निषिद्ध ठरतं. कारण लाकूड हे मंदसंक्रामक आहे आणि लाकडी पाट वापरल्यास उजेर्चा निचरा होत नाही. यासाठी लोकरीसारख्या आसनामुळे पृथ्वीची आंतरिक उष्णता, उर्जा यांचा आपल्याला उपदव होत नाही.

नित्य अऱ्हिकामध्ये संध्या, पंचमहायज्ञ इत्यादीप्रमाणे देवपूजेलाही महत्त्वाचं स्थान आहे. व्यक्तिगत उत्कृष्ट संस्कारासाठी संध्या आणि अन्नावरील संस्कारासाठी पंचमहायज्ञ आणि घरातील वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी देवपूजा अत्यंत आवश्यक असते. देवपूजेमध्ये प्रामुख्याने शुद्ध वातावरण निमिर्ती हा भाग असतो. देवपूजेपूवीर् घर आणि देवघर झाडून-लोटून स्वच्छ करणं, देवांची भांडी घासून-पुसून स्वच्छ ठेवणं, फुलं, उदबत्ती, नैवेद्य, निरांजन इत्यादी पूजेची तयारी करणं, देवासमोर रांगोळी घालणं ही वातावरणनिमिर्ती पूजेएवढीच महत्त्वाची आहे. देवपूजा करताना म्हणण्यात येणारी सूक्ते आणि मंत्रं वातावरण शुद्धी करतात. वैदिक मंत्र येत नसतील तर पूजा करताना येत असलेली प्राकृत स्त्रोत्रं किंवा नामावली मध्यम स्वरात अवश्य बोलावी. घरातली किंवा पाहुणे मंडळी या वातावरणामुळे भारावून जातात आणि त्यांच्या मनात एखादी वाईट भावना येत असेल तर ती नाहीशी होते. देवपूजेमुळे सामाजिक आणि कौटुंबिक लाभ प्राप्त होतात. देवपूजा करताना मनाची एकाग्रता, अवांतर विचारांचा विसर आणि इष्टदेवतेविषयी भक्तिभाव यामुळे पूजेनंतर मनाला अत्यंत अल्हाददायक आणि उल्हासदायक वाटतं. देवपूजा हा उत्कृष्ट मानसिक व्यायाम आहे. खास करून दररोज एका ठराविक वेळी पूजा केल्यास देवपूजेचा जास्तीत जास्त लाभ पूजार्कत्याला मिळतात.

देवपूजेमध्ये पंचगव्याचे अतिशय महत्त्व आहे. पंचगव्य म्हणजे गायीपासून उत्पन्न होणारे पदार्थ. यामध्ये गोमूत्र, गोमय, गोरस, गोदधी, गोघृत यांचा समावेश असतो. शरीरशुद्धी होण्यासाठी प्रथम पंचगव्याचं प्राशन करायचं असतं. त्याचबरोबर देवाची प्रतिमा आणि माळेचं पवित्रकरण करताना प्रथम त्यावर पंचगव्य प्रोक्षण करतात. ज्याप्रमाणे अग्नी इंधन नष्ट करतो, त्याचप्रमाणे देहात व्याधीरूपाने साचून राहिलेलं पाप पंचगव्याने नष्ट होतं. गोमूत्राच्या नित्य सेवनाने काही त्वचारोग समूळ नाहीसे होतात. तसंच काही अस्थीविकारांवर आणि काही यकृतसंबंधी व्याधींवर गोमूत्र आणि गायीचं दूध उपयुक्त ठरतं, असं आयुवेर्दात सांगितलेलं आहे.

पंचगव्याबरोबर पंचामृताचंही देवपूजेमध्ये महत्त्व आहे. पंचामृतात खडीसाखर, मध, तूप, दही आणि दूध या पाच वस्तुंचा समावेश होतो. यामध्ये मध हा अग्नीदिपक, नाडीशोधक, रक्तदोषनाशक, मलसारक, पुष्टीकारक, विषशोधक, त्रिदोषहारक असा आहे. तसंच खडीसाखर ही मधुर, स्निग्ध, वात-पित्त-कफहारक, दाहनाशक आहे. पंचामृत करताना साखर एक चमचा, मध दोन चमचे, तूप तीन चमचे, दही चार चमचे आणि दूध पाच चमचे असं प्रमाण घ्यावं. पंचामृत सेवनाने दिवसभरात झालेली शरीराची झीज भरून निघते.

देवपूजा करताना शंखनाद करणं ही एक प्रकारची कला आहे. दररोजच्या पूजेत आरतीची सुरुवात शंखनादाने अवश्य करावी. शंखनादामुळे आदिभौतिक आणि आदिदैविक पीडा संभवत नाही. कानात दडे बसून बहिरेपण आलेल्या, मानसिक संतुलन बिघडून भ्रमिष्ट झालेल्या, कानात चित्र-विचित्र आवाज होणाऱ्या तसंच विविध बाधा असणाऱ्या व्यक्तींच्या कानात शंखनाद केल्यास त्या व्यक्तीची प्रकृती सुधारत जाते.

मंदिरात किंवा देवपूजेमध्ये घंटानादाची प्रथा प्राचीन काळापासून आहे. घंटा हे मंगलमय पवित्र ध्वनीचं प्रतीक असून वातावरणामध्ये पवित्र भाव त्याने निर्माण होतो आणि मनाची एकाग्रता साधण्यास मदत होते. घंटानादातून ओंकाराची ध्वनी निमिर्ती होते. ध्वनीवर अलीकडे बरंच संशोधन चालू आहे. ज्या मातेच्या स्तनातून दूध येत नाही ते विशिष्ट परिणामांमुळे येऊ शकतं. जे रोपटं सहा महिन्यात फूल देतं ते रोपटं ध्वनिपरिणामामुळे दोन महिन्यात देऊ शकतं. पालेभाज्या, फळभाज्या यासुद्धा विशेष ध्वनीने प्रभावित होतात. घंटानादातून निर्माण होणाऱ्या ध्वनींमुळे २६ फूट परिघाच्या क्षेत्रात क्षयरोग, प्लेग, पटकी, विषमज्वराचे जंतू नष्ट होतात, असं १९१६ मध्ये जर्मनीतल्या बलिर्न विद्यापीठात संशोधन झालं आहे.

देवपूजेमधला पंधरावा उपचार म्हणजे प्रदक्षिणा. गणपतीला २१, विष्णूला ४, देवीला १, सूर्याला ७, मारूतीला ११ अशा प्रदक्षिणा घालतात. तर शिवाला अधीर् प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आहे. पंचायतन पूजा घरीच करणाऱ्यांनी स्वत:भोवती एकच प्रदक्षिणा घालावी. आपल्या संस्कृतीमध्ये पुत्रप्राप्तीसाठी पिंपळाला किंवा देवळाला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. संत ज्ञानेश्वरांच्या मातोश्रीने अश्वत्थाला दररोज १०८ प्रदक्षिणा १२ वर्षं घातल्याचं सर्वश्रुत आहेच. गर्भाची आतली गती ही प्रदक्षिणात्मक होत असते. प्रदक्षिणेमुळे सर्व शरीराला आणि शारीरिक क्रियांना अनुरूप अशी गती मिळते गर्भाशय आणि तत्संबंधी स्नायूंना चांगलं वळण लागतं आणि परिणाम टिकून राहतो. त्याचबरोबर एक महत्त्वाचा फायदा म्हणजे बद्धकोष्ठता, अजीर्णादी दूर होऊन शरीरातल्या वायूंना योग्य ती अनुलोम गती प्राप्त होते. मनोशारीरिक शुद्धी होते आणि सुप्तशक्ती जागी होऊन अध्यात्मिक प्रगती होते. 


- डॉ. तुषार यशवंत सावडावकर

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive