Friday, March 16, 2012

Tasty and faster recipes

Tasty and faster recipes

ट्रेनमध्ये पालेभाज्या निवडणाऱ्या, मटार सोलणाऱ्या बायका अनेकदा दिसतात. एकमेकींशी रेसिपीज शेअर करताना त्यांना कधी ऐकलंय? ऑफिस कम गृहिणी कम आई कम बायको अशा सगळ्या भूमिका निभावताना तिच्या मेंदूला एक चिंता कायम चिकटलेली असते. आज काय रांधायचं??

..........

संध्याकाळचे सहा वाजून गेलेत. म्हणजे नेहमीची ६.२८ गेलीच. बॉस मिटिंगमध्ये बोलतोच आहे. प्रज्ञाच्या डोक्यात मात्र घरी जाऊन काय जेवण करायचं याचे विचार सुरू झालेत. साडेआठ वाजनंतर स्वयंपाक करायचा म्हणजे काय पटकन तयार होईल याचा विचार तिचा मेंदू नकळत करायला लागलाय. कुठली भाजी फ्रिजमध्ये आहे? घरी जाऊन पटकन पोळ्या लाटायच्या की भाकरी टाकूयात? त्याला आवडणारी

चटणीही करायचीय? आज सकाळी मुलाने मंचाँव सूपचा हट्ट केला होता....घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकतोय तसे तसे तिचे विचारही...

मिताच्या घरी स्वयंपाकाच्या काकूंनी आठ दिवस सुट्टी घेतलीय. यामुळे तिची फारच धावपळ होतेय. एरव्हीसुद्धा काकूंना मेन्यू ठरवून

देणं आणि त्यांच्याकडून घरच्यांच्या पसंतीनुसार स्वयंपाक करवून घेण्याचं काम असायचंच.

राधालाही उद्या प्रेझेंटेशन लागलंय. तिची सासू नेमकी आजच बाहेर गेलीय. त्यामुळे स्वयंपाकघरात तिला लक्ष द्यायचंय. त्यामुळेच उद्याच्या प्रेंझेटेशनच्या तयारीबरोबरच तिला स्वयंपाकाची तयारीही करायचीय.

ही सगळी उदाहरणं आपल्या आजूबाजूचीच आहेत. नोकरीसाठी बाहेर पडली तरी 'ती' स्वयंपाकघरातून बाहेर पडलेली नाही. करणं किंवा करवून घेणं असलं तरी आज घरी गेल्यावर जेवायला काय? हा मुद्दा काही तिची पाठ सोडत नाही. पंचपक्वान्न नाही तरी निदान घरच्यांसाठी आणि स्वत:साठी पौष्टिक अन्न करण्याकडे तिचा कल असतो. मग, त्यातल्या त्यात कुठली भाजी पटकन होईल, थोडा जास्त वेळ मिळाला तर कुठला जास्तीचा पदार्थ करता येईल याचे विचार सतत तिच्या डोक्यात सुरू असतात.

लहानपणीची साधी गोष्ट. दुपारचं जेवताना आई मध्येच विचारायची 'आज रात्री काय करू? तेव्हा आपण हसायचो तिला म्हणायचो, की आताचं तर जेव.. रात्रीचं बघू काहीतरी. ते दुपारचं चवदार अन्न जेवून आपण आपल्या कामालाही लागायचो. रात्रीचं पुन्हा तिचं तिच बघायची. आज तिच्या भूमिकेत शिरल्यावर प्रत्येक मुलीला नक्कीच आईची आठवत येत असेल. घरी जाताना घ्यायच्या भाज्या, मसाले, आलं, कांदे-बटाटे यांची यादी आता कायम डोक्यात असते. ऑफिसचा दुपारचा डबा खाताना रात्रीच्या जेवणाचा मेन्यूही ती ठरवत असते.

कालिंदीला तर एक वेगळाच छंद लागलाय. पाच

मिनिटांच्या ब्रेकमध्ये किंवा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती इंटरनेटवरून सोप्या आणि कमी वेळात तयार होतील अशा रेसिपीज शोधत राहते. निदान रोजच्या 'जेवणाला काय'? याचा ताण तरी कमी होतो असं तिचं म्हणणं.

नोकरी आणि घर या दोन्ही कामगिरी पार पाडणारी 'सुपरवुमन' स्वयंपाकाच्या लढाईला थोडी कंटाळते. पण, सुपरवुमनच ती, हार कसली मानणार.. फक्त तिच्या भात्यात नवीन नवीन रेसिपीज पडायला हव्यात. समस्त बायकांचा हाच ताण कमी करण्यासाठी काही मिनिटांत होणाऱ्या खास रेसिपीजही आम्ही दिल्या आहेत. त्याबरोबर तुमच्या सुपीक डोक्यातूनही आणखी चवदार रेसिपीज येतीलच.

.....

सॅलाडच्या पानांचा पराठा

साहित्य : सॅलाडची पानं स्वच्छ धुवून चिरून त्यात तिखट, मीठ, ओवा तेल, कणिक घालून मळावे. नेहमीप्रमाणे खमंग भाजावेत. सॅलाडच्याच चटणीबरोबर ते खावेत. पटकन होणारी ही रेसिपी पौष्टिकही आहेत. सॅलाडच्या पानांत कॅल्शिअम, लोह, 'क' जीवनसत्व, मिनरल्स, प्रोटिन्स असतात.

ब्रेडचं थालीपीठ

ब्रेडच्या स्लाइस पाण्यातून घट्ट दाबून काढाव्यात. नंतर यात चिरलेला कांदा, कोथिंबीर, पालक, मेथी, तिखट आणि मीठ घालून ते मळून घ्यावे. यात पुन्हा पाणी घालू नये. नंतर याची छोटी छोटी थालीपिठे थापावीत. दही किंवा लोण्याबरोबर ही थालीपीठे छान लागतात.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive