Friday, March 23, 2012

जपणूक परंपरेची - Marathi Peoples in Delhi

 दिल्लीत तीन-चार लाख मराठी बांधव आहेत. ते महाराष्ट्रातील आपापल्या परंपरेनुसार हा सण साजरा करतात. परंतु दिल्लीत काही मराठी सहनिवास, मंडळे, शाळा आहेत, तेथेही गुढीपाडवा पारंपरिक प्रथेप्रमाणे साजरा केला जातो. जनकपुरी येथील दत्तविनायक मंदिरात सकाळी गुढी उभारून तिची पूजा केली जाते. मंदिरावरील ध्वजही दरवषीर् गुढीपाडव्याला बदलला जातो. सत्यनारायणाची पूजा व स्नेहभोजनही असते.

गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक, मराठी कॅलेंडरप्रमाणे नवीन वर्षाचा आरंभ या दिवशी होतो. मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी या दिवशी लहानपणी खाल्लेली आईच्या हातची कडुनिंबाची चटणी, दारावरची गुढी आणि श्रीखंड पुरीचे जेवण आठवून त्याचे मन गहिवरले नाही, असे होणे शक्य नाही. महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर लांब येऊन दिल्लीत स्थायिक झालेले मराठी बांधवही त्याला अपवाद कसे असतील?

पश्चिम दिल्लीतील आनंदवन मराठी सहनिवासातही गुढीपाडवा साजरा केला जातो. या संस्थेचा वर्धापनदिनही याच दिवशी असतो. येथेही गुढी उभारण्याबरोबरच संवत्सर वाचन, सत्यनारायण पूजा आणि स्नेहभोजन होते.

मराठी संस्थांबरोबरच दिल्लीतील चौगुले विद्यालयाच्या प्रांगणात गुढी उभारली जाते आणि पंचांगवाचन केले जाते. या कार्यक्रमाचे आयोजन मराठा मित्रमंडळ आणि शाळेतील शिक्षकवर्ग संयुक्तपणे करतात. मध्य दिल्लीतील कोपरनिकस मार्गावरील महाराष्ट्र सदन येथेही गुढीपाडवा साजरा होतो. सदनाच्या आवारात गुढी उभारली जाते, असे महाराष्ट्र सदनाच्या सहाय्यक निवासी आयुक्त नंदिनी आवडे यांनी सांगितले.

दिल्लीकरांना घरगुती श्रीखंड माफक दरात उपलब्ध करून देण्याचे काम श्रीयुत देव 'अमोल' श्रीखंड व आम्रखंड या ब्रँडद्वारे अनेक वर्षे करत आहेत. वर्षभर लोक त्यांच्याकडे श्रीखंड घेत असले तरी गुढीपाडव्याला त्याच्या विक्रीत लक्षणीय वाढ होत असल्याचे देव यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive