लग्नानंतर मुलीचे नाव बदलताना...
What are requirements to change Women name after marraige
लग्न...स्त्री असो अथवा पुरुष...लग्नानंतर दोघांच्या आयुष्यात बरेचसे बदल घडून येतात. आर्थिक असो अथवा अन्य कोणतेही. मात्र, ब-याच कुटुंबांमध्ये लग्नानंतर मुलींचे नाव बदलण्याची प्रथा आजही सुरू आहे. नाव बदलावे अथवा नाही, किंवा ती करण्यामागे नेमकी प्रक्रिया काय असते, या बाबत अनेकांच्या मनात बरेच गैरसमज आहेत. याविषयी...
.....
कातिर्की प्रधान (नाव बदलले आहे), पुण्यातील एका शाळेत शिक्षिका हणून काम करीत आहे. तिचे लग्न जमले असून, येत्या काही महिन्यात ती बोहल्यावर चढणार आहे. तिचा भावी नवरा सचिन जांभूळकर (नाव बदलले आहे) आयटी कंपनीमध्ये मोठ्या हुद्यावर आहे. त्या विषयी बोलताना, कातिर्की म्हणते, 'सुरुवातीला लग्नानंतर माझे नाव बदलण्याविषयी माझ्या मनात एक ना अनेक बऱ्याच शंका होत्या. त्यातील एक म्हणजे माझे आडनाव (प्रधान) नवऱ्याच्या आडनावाबरोबर लावावे अथवा नाही. त्यानंतर माहेरचे आडनावदेखील आवश्यक असल्याचे मला वाटू लागले, आणि विशेष हणजे त्यासाठी नवऱ्याची हरकत नाहीये.'
आजच्या आधुनिक जमान्यात कातिर्कीसारखा विचार अनेक लग्नेच्छुक मुलींच्या मनात डोकावत असतो. किंबहुना तो आजचा 'ट्रेण्ड' बनू पाहतो आहे. उदा. ऐश्वर्या राय बच्चन. मूळातच लग्नानंतर नाव बदलावे अथवा नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र, तुम्ही जर कातिर्कीसारखा विचार करीत असाल, तर तुम्हाला कायदेशीर आणि आथिर्क कागदपत्रांवर सर्वप्रथम नाव बदलून घेणे आवश्यक आहे. अन्यथा, भविष्यात अनेक अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे.
नाव बदलणे आणि मॅरेज सटिर्फिकेट Marriage Certificate
मंुबईस्थित फायनान्शियल प्लॅनर असणाऱ्या अमित देसाई यांच्या मते, नाव बदलण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे नाव बदलण्यासाठी राज्य सरकार दफ्तरी अर्ज करणे. जर लग्नानंतर तुमच्या नावात बदल होणार असेल, तर तुही विवाहनोंदणी विभागाकडे 'मॅरेज सटिर्फिकेट'साठी अर्ज करू शकता. त्यामुळे हे ध्यानात ठेवा की, लग्न झाल्यानंतर किमान दोन ते तीन महिन्यांनी 'मॅरेज सटिर्फिकेट' मिळते. 'मॅरेज सटिर्फिकेट' हेच लग्न झाल्याचा अधिकृत पुरावा असून, ते भविष्यातील आथिर्क आणि कायदेशीर व्यवहारांसाठी ग्राह्य धरण्यात येते. त्यामुळे लग्न झाल्यानंतर 'मॅरेज सटिर्फिकेट'ची आवश्यकता खऱ्या अर्थाने भासू लागते. हे प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रियाही पूवीर्पेक्षा आता खूप सोपी झाली आहे. 'हिंदू मॅरेज अॅक्ट' आणि 'स्पेशल मॅरेज अॅक्ट' प्रमाणे कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर यथावकाश लग्नाचे प्रमाणपत्र मिळते.
पर्मनंट अकाउंट नंबर (पॅन नं.) PAN No.
लग्नानंतर तुमचे बदललेले नाव, तुाच्या पॅन कार्डवर येणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया तातडीने करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण, सध्या कोणताही आथिर्क व्यवहार पार पाडण्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड क्रमांक अथवा पॅन कार्डची झेरॉक्सप्रत देणे आवश्यक आहे. मंुबईस्थित फायनान्शियल प्लॅनर असणाऱ्या पंकज मठपाल यांच्यामते, लग्नानंतर नाव बदलल्यास हा बदल त्वरित पॅनकार्डवर दिसणे आवश्यक आहे. ही प्रक्रियादेखील अतिशय सोपी आहे. नव्या पॅनकार्डसाठी अर्ज करताना ज्या प्रक्रियेचा अवलंब करावा लागतो, तीच प्रक्रिया नाव बदलण्यासाठीही लागू आहे. मात्र, ही प्रक्रिया सुरू करताना, तुमच्या जुन्या पॅन कार्डचा क्रमांक संबंधित अधिकाऱ्यांना देणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे नवे 'पॅनकार्ड' नव्या नावासह आणि जुन्या पॅन कार्ड क्रमांकासह मिळते. ही प्रक्रिया सुरू असताना तुम्हाला प्राप्त झालेल्या 'मॅरेज सटिर्फिकेट'ची अथवा विवाहनोंदणीसाठी केलेल्या अर्जाची झेरॉक्स प्रतही दाखल करणे आवश्यक आहे. 'पॅन कार्ड' क्रमांकात झालेला हा बदल तुम्ही तुमच्या कंपनीला, चार्टर्ड अकाऊंटंटला आणि आथिर्क सल्लागाराला कळविणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या इन्कम टॅक्सच्या दस्तऐवजात त्याप्रमाणे बदल करणे सहज शक्य होते.
बँकेला माहिती कळविणे आवश्यक Inform to Bank
नाव बदलल्यानंतरची सर्वांत महत्वाची आणि आवश्यक प्रक्रिया हणजे बदललेल्या नावाची बँकेला कल्पना देणे. 'लग्नानंतर महिला खातेदाराचे नाव बदलल्यास सर्वप्रथम तिने या निर्णयाबाबत बँकेला कळविणे आवश्यक आहे. नाव बदलाची माहिती देताना मॅरेज सटिर्फिकेट पुरावा म्हणून सादर करणे आवश्यक आहे. बँकेच्या कामकाजाप्रमाणे या प्रमाणपत्राबरोबरच अन्य कागदपत्रांचीदेखील मागणी करण्यात येऊ शकते,' अशी माहिती एचडीएफसी बँकेतफेर् देण्यात आली. सर्वसाधारणपणे बँकांमध्ये 'मॅरेज सटिर्फिकेट' आणि नोटरीकडून देण्यात येणारे सटिर्फिकेट या कागदपत्रांच्या आधारे नावबदलाची दखल घेण्यात येते. ज्यावेळी तम्ुही बँकेच्या शाखेत जाता, त्यावेळी तुमच्या पत्यात झालेला बदलही संबंधित अधिकाऱ्याच्या लक्षात आणून देणे गरजेचे आहे. त्यावेळी बँक तुम्हाला तुमच्या पतीचा पत्ता अथवा पासपोर्टची मागणी करण्याची शक्यता आहे.
क्रेडिट रिपोर्ट Credit report
तुमच्या नावबदलाची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर बँकेतील सर्व ठेवी आणि कर्ज खात्यांवर बदललेले नाव टाकण्यात आले आहे अथवा नाही, याची खात्री करणे आवश्यक आहे. 'ग्राहकांच्या नावातील आणि पत्यातील झालेला कोणताही बदल दर महिन्याला अपडेट करण्याच्या सूचना बँकांना करण्यात आल्याने त्याची नोंद आवश्यकच आहे. विशेषत: कर्ज खात्यांसाठी हे बदल नोंद करणे बँकांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. ही अपडेट करण्यात आलेली माहिती बँकांना क्रेडिट इन्फॉमेर्शन ब्युरोंना देणे बंधनकारक आहे,' असे एचडीएफसी बँकेतफेर् स्पष्ट करण्यात आले.
पासपोर्ट Passport
जर तुमच्याकडे लग्नापूवीर् पासपोर्ट असेल, तर तुमचे बदललेले नाव पासपोर्टवरही बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला पासपोर्ट कार्यालयाकडे अर्ज करून पासपोर्ट 'रि इश्शू' करणे आवश्यक आहे. नवीन पासपोर्ट मिळविण्यासाठी असणारीच संपूर्ण प्रकिया 'रि इश्शू' करण्यासाठी वापरण्यात येते. या साठी तुम्हाला जुन्या ओरिजिनल पासपोर्टसह मॅरेज सटिर्फिकेट स्वत:च साक्षांकित करून द्यावे लागते. सोबत तुमचा पासपोर्ट साइज फोटो आणि नवऱ्याचाही पासपोर्ट देणे आवश्यक आहे.
अन्य कागदपत्रे other documents
नावबदलाच्या प्रक्रियेनंतर तुमचे ड्रायव्हिंग लायसेन्स Driving license, मतदार ओळखपत्र आदी कागदपत्रांमध्ये बदल करणे आवश्यक आहे. जर एखाद्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये तुमचे नाव वारसदार म्हणून असेल, तरी कंपनीला ती माहिती देणे आवश्यक आहे. तुमच्या जुन्या नावावर ती पॉलिसी देणे कंपनीवर बंधनकारक नाही, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. बदललेले नाव कंपनीला न कळविल्यास भविष्यात उद्भवलेल्या परिणामांना सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहात, हे लक्षात ठेवा.
नावबदलासाठी आवश्यक कागदपत्रे
१. मॅरेज सटिर्फिकेट
२. विवाहनोंदणीसाठी केलेल्या अर्जाची झेरॉक्सप्रत अथवा नोटरीकडे केलेल्या अर्जाची झेरॉक्सप्रत
करावयाचे बदल : एका दृष्टिक्षेपात
१. पर्मनंट अकाउंट नंबर
http://tin.tin.nsdl.com/index.html
२. ड्रायव्हिंग लायसन्स
जवळच्या आरटीओ कार्यालयात संपर्क साधा
३. पासपोर्ट
http://passportindia.gov.in/
AppOnlineProject/welcomeLink
४. मतदान ओळखपत्र Election id card
http://eci.nic.in/ecimain1/index.aspx
५. बँकेची कागदपत्रे
तुमच्या शाखेत जाऊन चौकशी करावी.
६. प्रॉपटीर्ची कागदपत्रे Property documents
स्थानिक रजिस्ट्रार ऑफिसमध्ये चौकशी करावी.

No comments:
Post a Comment