हॉटमेलने नवा लूक देऊन लाँच केलेल्या लाइव्ह या नव्या सेवेला आव्हान देण्यासाठी गुगलने आपल्या जीमेलच्या सेवेत अनेक बदल केलेले आहेत . यातील आणखी एक महत्त्वपूर्ण बदल म्हणजे , कंपोज मेल आणि रिप्लाय मेलचा बदललेला लूक .
तुम्ही ज्यावेळी मेल कंपोजिंगचा पर्याय निवडाल तेव्हा आता इनबॉक्सच्या उजव्या बाजूला कंपोज मेलचा बॉक्स खुला होणार आहे . नव्याने खुला होणारा बॉक्स हा चॅट विंडोसारखा दिसेल मात्र तो जीचॅटपेक्षा मोठा असणार आहे . यामुळे तुम्ही कंपोजिंग करत असताना तुम्हाला इनबॉक्समध्ये येणाऱ्या मेल्सवरही लक्ष ठेवता येणार आहे . याचबरोबर कंपोजिंग करताना आपल्याला एखादा मेल सर्च करायचा असेल तर तो पर्यायही आता आपल्यासाठी खुला असणार आहे . याचबरोबर आपण वेगवगेळ्या विंडोज तयार करून एकावेळी एकापेक्षा जास्त ई - मेल्सही कंपोज करू शकतो . अनेकदा आपण मेल टाइप करत असताना आपल्याला इनबॉक्समधील अनेक मेल्सचा संदर्भ घ्यायचा असतो . जुन्या पद्धतीमध्ये आपल्याला मेल कंपोज करत असताना तो डिस्कार्ड किंवा सेव्ह करून नंतर इनबॉक्सचा संदर्भ घ्यावा लागत होता . पण आता नवीन पद्धतीमध्ये आपल्याला मेल डिस्कार्ड किंवा सेव्ह न करता संदर्भ घेता येणे शक्य होणार आहे . यामुळे मेल कंपोजिंगचा तुमचा काही मिनिटांचा वेळ वाचणार आहे . याचबरोबर आपण मेलला रिप्लाय करण्याची पद्धतही बदलण्यात आली आहे . यामध्ये तुमच्या स्क्रीनची जागा कमी घेतली जाते . तसेच आपण एखाद्या व्यक्तीशी कितीवेळा आणि कशाप्रकारे संवाद साधला हेही आपल्याला या नव्या पद्धतीत एका दृष्टीक्षेपात कळणे शक्य होणार आहे . गुगलने हा बदल दोन दिवसांपूर्वी केला आहे . अनेकांनी याचा वापर करण्यास सुरूवात केली असेलच . पण जर तुम्हाला हा पर्याय आवडला नाही तर तुम्ही सध्याची पद्धत वापरू शकता . पण ही सुविधा केवळ एक महिनाच उपलब्ध आहे . यानंतर तुम्हा सर्वांना नवीन पद्धतीशिवाय पर्याय राहणार नाही .
याशिवाय गुगलने आणखी काही नवीन सुविधा अॅड केल्या आहेत . यामध्ये मेसेजमध्ये इनलाइन इमेजेस आपण इनसर्ट करू शकतो . तसेच जेव्हा आपण मेल आयडी टाइप करतो त्यावेळी जर तो जीमेल युजर असेल तर त्याचा फोटो आणि प्रोफाइलही आपल्याला पाहता येणार आहे . भविष्यात गुगल इमोशन्स , इव्हेंट इन्व्हिटेशन्स , रीड रीसिप्ट्स आणि कॅन्ड रिस्पॉन्स अशा सुविधाही सुरू होणार आहेत . यासंदर्भातील माहितीसाठी तुम्ही गुगलच्या जीमेल हेल्पपेजवर जाऊ शकता .

No comments:
Post a Comment